▬▬▬▬▬▬⚜⚜⚜▬▬▬▬▬▬
प्राणाघातीं निवृत्ती, परधनहरणीं संयमाला वरावें,
दानें द्यावी सशक्त्या, परयुवतिकथा चालतां मूक व्हावें,
तृष्णाभावी रमावें, विनय गुरुजनीं, सत्यवाणी वदावी,
भूतीं प्रीती धरावी, भवपथसरणी यापरी आदरावी.
विवरण:
दुसऱ्याचा प्राणघात करण्याची बुद्धी नसावी, दुसऱ्याचे द्रव्यहरण करण्याची बुद्धी झाल्यास संयमन करावे, (मन आवरून धरावे). परक्या स्त्रीविषयी जिथे चर्चा चालू असेल , तिथे मौन सेवावे, तृष्णाभावी रमावे (द्रव्याची हाव नसावी) खरे बोलावे, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी प्रेम असावे. अशी ही भवपथसरणी (संसारमार्गक्रम) लोकांनी आदरावी.
धन्यवाद - वरदा प्रकाशन पुणे
लेखक - नारायण नरसिंह फडणीस
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#मुलांचीशाळामराठी
#लोकभाषामराठी

No comments:
Post a Comment