Thursday, May 10, 2018

#सुभाषितमराठी - २

▬▬▬▬▬▬⚜⚜⚜▬▬▬▬▬▬

पद्मारण्य त्यजोनि मधुकरनिकरीं शोधिलें दानवारी,
हा!हा! उन्मादयोगें द्विरदवर  तया कर्णताली निवारी;
आमोदीं भृंगराजी पुनरपि रमली जाऊनि पद्मभागीं,
पाहूनी गंडहानी करिवर मजला वाटतो हा अभागी!

विवरण:

कोणी एक याचक अन्योक्तिरूपाने म्हणतो- धनवंताने जरी याचकांचा अव्हेर केला तरी त्यात याचकाची काही हानी नाही,उलट त्याच्या द्रव्याचीच म्हणजे त्याचीच त्यात हानी आहे.

उदाहरण पहा - निरंतर प्रफुल्लित कमलवनी राहून जे भृंग तृप्त असतात, ते जर त्या कमलवनाचा  त्याग करून हत्तीच्या गंडस्थळातील दानोदकाकरिता (दान-मदस्त्राव)  प्राप्त झाले तर तो हत्ती कानाच्या पाळ्याने त्यांचे निवारण करितो. (धिक्कार करितो).तेव्हा ते भृग पुनः कमलवनात जाऊन आमोद सेवन करितात. ही हत्तीची गंडहानी पाहून हा हत्तीच अभागी आहे असे मला वाटते.

अलंकार- येथे पर्यायोक्ती अलंकार साधला आहे. हत्ती मदस्त्रावाचा लाभ भ्रमरास देत नाही, ते कमलाकडे परत जातात. असे तिखट मीठ लावून वर्णन केले आहे. असे वर्णन असले की पर्यायोक्ती अलंकार होतो.

धन्यवाद - वरदा प्रकाशन पुणे
लेखक - नारायण नरसिंह फडणीस

#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

▬▬▬▬▬▬⚜⚜⚜▬▬▬▬▬▬

No comments:

Post a Comment